शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाच्या प्रोत्साहन अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:26 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही.१५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किमान एका महिन्याच्या आत संबंधित लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही. या बाबीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी १५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या. आतापर्यंत प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या लाभार्थीना अनुदान वितरणासाठी २०१२ च्या बेसलाईन सर्वे यादीनुसार लाभार्थी पात्र आहे की नाही याची खात्री करावी, शौचालय बांधकामासंदर्भात पडताळणी करून तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर देयके सादर करावे, अशा सूचना दिल्या. १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण कार्यवाही करून कुणीही पात्र लाभार्थी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, दप्तर दिरंगाईमुळे  लाभार्थी हा अनुदानापासून वंचित राहिल्यास तालुकास्तरीय यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला. १५ आॅगस्टची अंतिम मुदत संपल्यानंतर, अनुदान वितरणासाठी कुणी लाभार्थी शिल्लक राहिला नसल्याबाबतचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करावे, अशा सूचना मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान