शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विहिर योजनेच्या लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 16:54 IST

मालेगाव (वाशिम) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर  व बिरसामुंडा कृषी स्वावलंबन योजनाच्या लाभार्थ्यांना सिंचन विहिरीच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर  व बिरसामुंडा कृषी स्वावलंबन योजनाच्या लाभार्थ्यांना सिंचन विहिरीच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा कायम आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत २०१८-२०१९ या वर्षासाठी तीन महिन्यांपूर्वी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. निवड झाल्यानंतरही पात्र शेतकºयांना सिंचन विहिर बांधकामाचे कार्यारंभ आदेश वेळेवर मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना विलंबाने विहिर बांधकाम सुरू करावे लागले. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील अनुदान पात्र शेतकºयांना मिळणे अपेक्षीत असताना, अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. विहिरींचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाही अनुदान मिळत नसल्याने शेतकºयांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. मालेगाव पंचायत समितीला  कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाहीत. या योजनेतही ‘राजकारण’ शिरल्याने पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप लाभार्थींमधून होत आहे. मालेगाव पंचायत समितीमधील या योजनेतील लाभार्थींच्या ‘फाईल’ गटविकास अधिकाºयांच्या टेबलवर स्वाक्षरीविना पडून आहेत. गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षºया झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे अनुदान जमा होईल असे पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. प्रभारी गटविकास अधिकारी बी. एस. गुहे हे रिसोड येथे असल्याने ही प्रक्रिया ठप्प पडली आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकºयांना बसत आहे.

 

रिसोड येथील ग्रामसेवकांची मीटिंग असल्याने मालेगाव येथे जाऊ शकलो नाही. रिसोड तालुक्यातील या योजनेतील शेतकरी लाभार्थीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. एक-दोन दिवसात मालेगाव तालुक्यातील लाभार्थींच्या फाईलवर स्वाक्षरी करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल.- एस.बी. गुहे    प्रभारी गटविकास अधिकारी. पंचायत समिती मालेगाव

टॅग्स :washimवाशिम