शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे -  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:41 IST

सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गोल्ड कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयात नोंदणी करून हे गोल्डन कार्ड प्राप्त घेता येईल. सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या ई-कार्ड वाटप विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. स्वप्नील सरनाईक, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, देशमुख यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लक्ष ५९ हजार ६४१ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणावे. एखाद्या कुटुंबास माननीय प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणावे, अशा सूचनाही मोडक यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मीना म्हणाले, आशा वर्कर्सच्या माध्यमातून प्रत्येक लाभाथ्यार्ला गोल्डन कार्ड बनविण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार कॉमन सर्व्हिस सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये येणाºया लाभार्थ्यांचे कार्ड त्वरित बनवून दिले जावे, असे सांगितले.

टॅग्स :washimवाशिमayushman bharatआयुष्मान भारत