शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दोन ठिकाणी नाफेडच्या खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:49 IST

वाशिम: जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर येथे नाफेडच्यावतीने मुग, उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली असून, अद्यापही चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर येथे नाफेडच्यावतीने मुग, उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली असून, अद्यापही चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आहे. दरम्यान, मालेगाव बाजार समितीच्यावतीने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.बाजारात यंदाच्या शेतमालास नगण्य भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाकडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर शासनाच्यावतीने ३० सप्टेंबरपासून हमीभावाने खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात उडिद आणि मुगाच्या खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. तथापि, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने नोंदणी करणाºया शेतकºयांत रोषाचे वातावरण होते. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन अखेर कारंजा आणि मंगरुळपीर या दोन बाजार समित्यातंर्गत नाफेडच्यावतीने मुग आणि उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली. तर अद्यापही वाशिम, रिसोड, मानोरा आणि मालेगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. दरम्यान,मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रमोद नवघरे यांनी मालेगाव येथे नाफे डचे खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनही त्यांच्यावतीने सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती