शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून!

By सुनील काकडे | Updated: June 14, 2024 17:52 IST

शत्रुघ्न याने काही दिवसांपूर्वी किसनसिंग ठाकूर नामक व्यक्तीकडून ६ लाख रुपये उसणे घेतले होते.

वाशिम : उसनवारीने घेतलेल्या पैशांची परतफेड न करता पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांना दीड लाख रुपये द्यावे लागले आणि उसनवारीचे ६ लाख रुपये बुडाले म्हणून एका इसमाने आपल्यावर दोनवेळा चाकूहल्ला करून विहिरीत ढकलून दिले. या घटनेत सुदैवाने जीव बचावला, अशी आपबिती तालुक्यातील अनसिंगनजिकच्या पिंपळगाव येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य पंडिता पुंजाराम भुसारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे १४ जून रोजी कथन केली.

यासंदर्भातील निवेदनात पंडिता भुसारे यांनी नमूद केले आहे की, मुलगा शत्रुघ्न याने काही दिवसांपूर्वी किसनसिंग ठाकूर नामक व्यक्तीकडून ६ लाख रुपये उसणे घेतले होते. शत्रुघ्नने ते पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. ही बाब ठाकूर यांनी आपणास सांगिल्यानंतर थोडेथोडे करून पैसे परत करतो, अशी ग्वाही त्यांना दिली. असे असताना ३० मे रोजी शुभम भालेराव व अन्य पाच जणांनी शत्रूघ्नला मारहाण केली व रात्रभर एका खोलीत डांबून ठेवले. ३१ मे रोजी सकाळी मोबाईलवर फोन करून शुभम भालेराव याने ६ लाख रुपये घेवून या आणि मुलाला सोडवून न्या, असे सांगितले. त्यामुळे मी अनसिंग पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही सहकार्य करून मुलास सोडवून आणले. यावेळी तक्रार मागे घेतल्यास ६ लाख रुपये माफ करू, अशी बतावणी भालेराव याने केली. त्यामुळे प्रकरण आपसात केले.

दरम्यान, ९ जून रोजी फाट्यावरील पंपावरून गाडीत पेट्रोल भरून घरी जात असताना शेलू खु. फाट्याजवळ दोघांनी थांबवून गाडीची चावी काढून घेतली. काही वेळानंतर तिथे किसनसिंग ठाकूर व मुन्ना पडघान हे दोघे आले. यावेळी पडघान याने आम्हाला पोलिस स्टेशनला दीड लाख रुपये द्यावे लागले, असे म्हणत डोक्यात चाकू मारला. तसेच ६ लाख रुपये बुडले, असे म्हणत पुन्हा चाकूचा वार केला. किसनसिंग ठाकूर याने लोखंडी टामीने मारहाण केली. तसेच विहिरीत ढकलून दिले. सुदैवाने तिथे जमलेल्या लोकांपैकी काहींनी विहिरीतून काढून सरकारी दवाखान्यात भरती केले. तेव्हापासून आजपर्यंत दवाखान्यातच असल्याचे भुसारे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अनसिंग येथे सावकारीचे मोठे रॅकेट सक्रियपंडिता भुसारे यांनी अनसिंग येथे सावकारीचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे सांगून संबंधित मंडळी बळाचा वापर करून वसूली करित असल्याचे निवेदनात नमूद केले. धाक निर्माण करण्यासाठी आपणावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास मला व मुलास जिवे मारले जाईल, अशी कैफियत त्यांनी एसपींकडे मांडली.

दोषींवर होणार कठोर कारवाई!अनसिंग येथे घडलेल्या या घटनेची सखोल चाैकशी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर नियमानुसार कठोर कारवाई होईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही.- अनुज तारे, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी