शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 17:26 IST

वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली.

ठळक मुद्देशिवाजी शिंदे हे सकाळच्या सुमारास गोगरी येथील शिवारात लघूशंकेसाठी गेले होते.अचानक तेथे अस्वल आले आणि त्यापे शिवाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार लोकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलात पळून गेले.

वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली. शिवाजी वामन शिंदे, असे जखमीचे नाव असून, अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने मोठी दुखापत झाली आहे. शिवाजी शिंदे हे सकाळच्या सुमारास गोगरी येथील शिवारात लघूशंकेसाठी गेले होते. लघूशंक करीत असतानाच अचानक तेथे अस्वल आले आणि त्यापे शिवाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. यात अस्वलाने त्यांच्या हातावर नखाने ओरबडले, तर पायाला चावा घेतला. त्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली. हा प्रकार लोकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलात पळून गेले. त्यानंतर शिवाजी शिंदे यांना उपचारासाठी शेलूबाजार येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर येडशी बिटच्या वनरक्षक पी. जी. अहिर, कोळंबी बिटचे वनरक्षक जी. बी. जामकर, वनोजा बिटचे वनरक्षक एम. बी. देवकते यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे व वनमजुरांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि विलास शंकरराव शिंदे रा. गोगरी, प्रमोद दौलतराव शिंदे रा. गोगरी यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे स्वाक्षरीनिशी वनरक्षक पी. जी. शिंदे यांनी पंचनामा केला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwildlifeवन्यजीव