शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण डॉक्टरांनो सावधान, विनापरवानगी उपचार पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:26 IST

Washim News : असा प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसºया लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मे महिन्यात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असून, ग्रामीण भागात अजूनही काही डॉक्टर कोरोना रुग्णांवर विनापरवानगी उपचार करीत असल्याचे समोर आले आहे. अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत केले असून असा प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.पहिल्या लाटेत जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता.मालेगाव) येथे पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. दुसºया लाटेत फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. एप्रिल महिन्यापर्यंत शहरी भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून आले. मे महिन्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील १५ जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची आॅनलाईन पद्धतीने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी ग्रामीण भागातील गृहविलगीकरण शक्यतोवर बंद ठेवून संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर हे सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करताना, कोरोना चाचणीचा सल्ला देत नाहीत किंवा चाचणीसाठी सरकारी आरोग्य केंद्रांकडे पाठवित नसल्याचे समोर आले. यामुळे संदिग्ध रुग्णांपासून इतरांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. कोरोनासदृश लक्षणे असतानाही चाचणीचा सल्ला न देणारे, चाचणीसाठी न पाठविणाºया ग्रामीण डॉक्टरांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ˘याशिवाय कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. विनापरवानगी कोरोना रुग्णांवर उपचार करणे, कोरोना चाचणीसाठी रुग्णांना आरोग्य केंद्रात न पाठविणाºया डॉक्टरांना यापुढे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कारवाईत सातत्य हवे !विनापरवानगी कोरोना रुग्णावर उपचार करणे, संशयास्पद पदवी आढळणे याप्रकरणी २४ मे रोजी कारंजा शहरातील एका खासगी डॉक्टरवर संयुक्त पथकाने कारवाई केली आहे. यापूर्वीदेखील ग्रामीण भागातील दोन बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती. हे तीन अपवाद वगळले तर बोगस डॉक्टरवर ठोस कार्यवाही नाही. मान्यताप्राप्त विद्यापिठाची वैद्यकीय पदवी किंवा पदविका नसणे, विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार करणे आदी प्रकरणी ग्रामीण भागात शोध घेतला जाणार आहे. या कारवाईत सातत्य हवे, असा सूर उमटत आहे. 

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या