शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:20 IST

Gram Panchayat elections यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देएकूण २४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी होण्याची शक्यता धूसर बनत आहे.

वाशिम : तालुक्यातील २४  ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असून, या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.वाशिम तालुक्यातील २४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आला आहे. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव, काटा, तामशी, सावरगाव जिरे, अडोळी, अनसिंग, पार्डी टकमोर, काजळांबा या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींसह एकूण २४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता, महाविकास आघाडी होण्याची शक्यता धूसर बनत आहे. सर्वच पक्ष, आघाड्या, पॅनल या स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या बॅनरऐवजी स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाडी, पॅनल उभे करून लढविली जाते. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधकांनी कंबर कसल्याने लढती या अतितटीच्या होण्याचे संकेत आहेत. विशेषत: तोंडगाव, अडोळी, तामशी, काटा, पार्डी टकमोर, अनसिंग, सावरगाव जिरे येथील निवडणुक प्रतिष्ठेची ठरत असल्याने याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

 या आहेत २४ ग्रामपंचायतीवाशिम तालुक्यातील  कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पाडी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा. या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिमElectionनिवडणूक