वाशिम/उमरेड : कौटुंबिक कार्यक्रम आटोपून पुणे येथून नागपूरच्या दिशेने कारने निघालेल्या उमरेड येथील एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने झडप घातली. समृद्धी महामार्गावर शेलुबाजार ते मालेगावदरम्यान गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली.
अपघातात उमरेड येथील प्रसिद्ध व्यापारी राधेश्याम शिवनारायण जयस्वाल (६७), वैदेही कीर्ती जयस्वाल (२५), माधुरी कीर्ती जयस्वाल (४३) आणि संगीता अजय जयस्वाल (५२) ठार झाले. कारचालक चेतन हेलगे (२५) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राधेश्याम जयस्वाल यांचा मोठा मुलगा राज याच्या मुलाचा नामकरण सोहळा गुरुवारी पुणे येथे होता. यामुळे कुटुंबीय तेथे गेले होते.