शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बँका पोलीस बंदोबस्तात करणार कर्जवसूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:41 IST

वाशिम :   राज्यातील नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्या मार्फत केली जाणारी कर्जवसुली आणि जप्तीची कारवाई आता पोलीस संरक्षणात केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   राज्यातील नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्या मार्फत केली जाणारी कर्जवसुली आणि जप्तीची कारवाई आता पोलीस संरक्षणात केली जाणार आहे. बँक अधिकाºयांकडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. तसेच पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांनी दर तीन महिन्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्याबरोबर बैठका घेण्याचे आदेश राज्य सरकारने २९ जानेवारी रोजी दिले आहेत.राज्यातील नागरी सहकारी बँका व सहकारी पतसंस्था यांच्या कडून केल्या जाणाºया वसुलीच्या कामासाठी संरक्षणाची मागणी केल्यास त्याची पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिक्षक यांनी तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, संबधित बँकेच्या कर्जवसुली व  जप्तीच्या कारवाई दरम्यान कागदपत्राची पूनर्तपासणी पोलीसांमार्फत करण्यात येवू नये असेही स्पष्ट केले आहे. पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बँकासोबतच्या बैठकीत संरक्षणातील अडचणी समजून घेवून त्यावर उपाययोजना करावी, कर्ज वसुलीच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यवाही करावी असे सूचित केले आहे. बँकांनी बंदोबस्तांची मागणी किमान १५ दिवस अगोदर करावी, जप्ती कारवाई ही शक्यता कार्यालयीन  कामकाजाच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करावी, जप्ती कारवाईच्या वेळेस संबंधित बँक किंवा पतसंस्थेच्या अधिकाºयांनी चित्रीकरण करावे आदिंचा सुचनांमध्ये समावेश आहे.

पोलीस खात्यामार्फत योग्य तपासणी झाल्यानंतर आणी त्या प्रकरणाच्या बाबतीत शुल्क आकारल्यानंतर आम्ही बंदोबस्त प्रदान करू. बँक कर्जदारांच्या थकबाकीदाराकडून कर्ज वसुलीसाठी देण्यात येणाºया पोलीस बंदोबस्त संदर्भात शासनाने सुचविलेल्या प्रक्रियांचे पालन करून बँक अधिकाºयांना योग्य सहकार्य करू. - मोक्षदा पाटील, पोलीस अधिक्षक, वाशिम

नागरी सहकारी बँका आणि सहकारी पत संस्था यांच्या मार्फत केल्या जाणारी कर्जवसुली आणि जप्तीच्या कारवाईसाठी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी शासनाने परिपत्रक काढल्यामुळे आमच्या क्षेत्रातील वसुली अधिकाºयांना व कर्मचाºयांसाठी आनंदाची बाब आहे. पोलीस संरक्षण मिळाल्यास कर्जदारांकडून कर्जाची वसुली करणे अतिशय सोपे होऊन जाईल. याशिवाय जप्तीच्या कार्यवाहीमध्ये कुणीही अडथळा निर्माण करून शकणार नाही. 

 - श्रीराम करवा, वसुली अधिकारी, वाशिम अर्बन बँक वाशिम

टॅग्स :washimवाशिमbankबँक