शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबतच्या ‘एलडीएम’च्या निर्देशांना बँकांच्या ‘वाकुल्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:13 IST

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत.

ठळक मुद्देकर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही.शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने (एलडीएम) तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत फर्मान सोडूनही त्याचे पालन न झाल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे आटोपून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली आहे. बँकांकडून पीक कर्जाची रक्कम हाती पडल्यास बि-बियाणे, खत यासह इतर आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही. अशातच शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वस्तूनिष्ठ वार्तांकन केले. त्याची दखल घेत जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील संबंधित सर्व बँकांना तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत कळविले होते. मात्र, त्यास कुठल्याच बँकेने जुमानले नाही. त्यामुळे अखेर १७ मे रोजी जिल्ह्यातील बँकांना पत्र पाठवून शेतकºयांकडून होत असलेल्या तक्रारींबाबत अवगत करून यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयांकडून कुठले दिशा-निर्देश आहेत, त्याबाबत कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बँकांनी अवलंबिलेल्या असहकार धोरणाविरूद्ध जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून प्रश्न तत्काळ निकाली न निघाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा काही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी