शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:31 IST

जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते.

वाशिम (संतोष वानखडे) : वाशिम हा जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने बँकांनी कर्ज प्रकरणांतील त्रूटींची पुर्तता करावी. बँकांनी उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बॅंकांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, विविध बँकाचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले की, जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने कर्ज प्रकरणे बँकांनी त्रृटीची पुर्तता करुन तातडीने मंजूर करावी. बँकांनी उद्योग/व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये. ऑक्टोबरपर्यंत सर्व महामंडळांनी कर्ज प्रकरणे कोणत्याही परिस्थीतीत बँकांकडे सादर करावी. सर्व बँक शाखांनी त्यांच्याकडे आलेली कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सर्वच बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा. जिल्हयातील तरुण, तरुणींना तसेच बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांची कर्ज प्रकरणे एका विशिष्ट कालावधीतच मंजूर करण्यात यावी, असे निर्देशही शण्मुगराजन एस. यांनी दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीbankबँक