शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भूविकास बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग बंद!

By admin | Updated: October 29, 2014 22:43 IST

उच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

नागेश घोपे/ वाशिमकर्जाच्या डोंगराखाली दबून अखेरच्या घटका मोजणार्‍या राज्यातील भूविकास सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परिणामी, साडेसहाशे कोटींची थकबाकी असलेल्या या बँका पुनरज्जीवित होण्याचा मार्ग आता कायमचा बंद होण्याच्या उंबरठय़ावर आहे. बँक व्यवस्थापनाने यापूर्वीच अठ्ठाविस पैकी तब्बल शाखा बंद केल्या असून, उर्वरित शाखांचा गाशा गुंडाळण्याची तयारीही आता सुरू करण्यात आली आहे.शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांना वित्त पुरवठा करण्याचा उद्देश डोळय़ासमोर ठेऊन, १९६२ साली प्रादेशिक ग्रामीण विकास बँकेचे भूविकास बँकेत रूपांतर करण्यात आले. कृषी विकासासाठी शेतकर्‍यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करीत होती. विहिरी बांधणे, शेतात पाइपलाईन टाकणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, अशा दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी कामांतून कृषी उत्पादनात वाढ करण्याचे या बॅकांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी राज्य शासनाकडून बँकेला निधी दिला जात होता. त्यातून शेतीसाठी कर्जपुरवठा केला जात होता; मात्र थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढल्याने बँकेच्या कामकाजावर मयार्दा आल्या. २00१ पासून भूविकास बँकेने कर्जपुरवठाही बंद केला होता. बँकेची साडेसहाशे कोटींची थकबाकी असल्याने त्याच्या वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना आणून, सहकार विभागाकडूनही अनेक प्रयत्न झाले. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला; मात्र आर्थिक स्थिती सुधारली नाही. २00९ नंतर कर्मचार्‍यांना वेतनही अनियमित मिळत होते. त्याचा परिणाम म्हणून अठ्ठावीस जिलंत शाखा आणि तेराशे कर्मचार्‍यांचा डोलारा असलेल्या भूविकास बँकेच्या सतरा शाखा सहकार आयुक्तांनी अवसायनात काढल्या होत्या. २00९ मध्ये वैद्यनाथन समितीने केलेल्या शिफारशीनुसार भूविकास बँकाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी शासनाकडून १,0९३ कोटींचे अर्थसहाय्य मिळणार होते; मात्र ही रक्कम देऊनही बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता दिसून येत नव्हती. त्यामुळे या शिफारशींकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही. दरम्यान, या बँकेचे पुनरूज्जीवन करण्यात यावे यासाठी नाशिकच्या एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गत आठवड्यात ही याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या बँकेच्या पुनरूज्जीवनाची कवाडं कायमची बंद होण्याची शक्यता आहे.