शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत करा स्वस्त प्रवास; पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ!

By दिनेश पठाडे | Updated: September 29, 2023 15:02 IST

विशेष दर्जा काढल्यामुळे येत्या काही दिवसांत तिकीट दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

वाशिम : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे दिवाळीच्या कालावधीत पुणे-वाशिम-पुणे  चे तिकीट २ हजारांवर पोहचते. अशावेळी या रेल्वेने सध्याच्या तिकीटदरानुसार स्लीपरने ४७० रुपयांत प्रवास करणे शक्य आहे. विशेष दर्जा काढल्यामुळे येत्या काही दिवसांत तिकीट दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

त्यानुसार २९ सप्टेंबरपर्यंत नियोजित असलेले गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ ऑक्टोंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोमवार आणि शुक्रवारी पुणे येथून रात्री १०:५० वाजता सुटून वाशिम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ मिनिटांनी पोहोचेल १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होईल.  या कालावधीत रेल्वेच्या १४ फेऱ्या होतील.  तर ३० सप्टेंबरपर्यंत नियोजित असलेले गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २ ऑक्टोंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

ही रेल्वे  अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल. अप-डाऊनच्या १४  फेऱ्या होणार आहेत. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा येथे थांबा  आहे. दरम्यान, या विशेष एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांक दिला आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रकात रेल्वेचा लुज टाइम कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे