शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे प्रत्येक घरापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचतील - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:16 IST

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आर्थिक समावेशकतेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोस्ट अकाऊंट नागपूर विभागाचे संचालक एस. के. पांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रितेश मलिक, भूपेश थुलकर, तेजराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.आठवले पुढे म्हणाले, टपाल खाते व पोस्टमन यांनी आजपर्यंत देशभरातील नागरिकांचे सुख-दु:खाचे संदेश नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मनीआॅर्डर, बचत खाते, आरडीसारख्या आर्थिक सुविधा पुरवून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, वंचित घटकांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नात आता टपाल खाते सहभागी होत असून प्रत्येक पोस्टमन आता बँकिंग सुविधा घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज तंत्रज्ञानाच्या युगात आॅनलाईन स्वरूपातील बँकिंग वाढले असल्याचे सांगून आठवले म्हणाले, कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या माध्यमातून सुद्धा आधुनिक, अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच बँक खाते उघडणे करणे तसेच बँकेचे व्यवहार करण्याची प्रक्रिया सोपी राहणार आहे. याकरिता पोस्टमन नागरिकांच्या घरापर्यंत जावून या सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’चे क्यू-आर कार्ड व स्पेशिअल कव्हरचे अनावरण यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ खातेधारक नागरिकांना क्यू-आर कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी वाशिम पोस्ट शाखेचे विपणन अधिकारी सुनील लखाने, पोस्ट मास्तर एस. जी. गर्दे, डाक निरीक्षक नरेश शिंदे आदी उपस्थित होते. संचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPost Officeपोस्ट ऑफिसRamdas Athawaleरामदास आठवले