शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:58 IST

वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता.

वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५.१८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला असून, सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  वाशिम जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी व पंचायत विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी मिळाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळपिकांचेही नुकसान झाले. एकूण  २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाईचा १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी प्राप्त होताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने हा निधी तहसिल कार्यालयांकडे सुपूर्द केला.

वाशिम तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १ कोटी ४९ लाख ३० हजार ६३० रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात एक कोटी ५६ लाख ७८ हजार ४७० रुपये, रिसोड तालुक्यात ११ कोटी १४ लाख ९२ हजार २८० रुपये, मंगरूळपीर तालुक्यात २८ लाख ५४ हजार ७२० रुपये, मानोरा तालुक्यात ४३ लाख २० हजार ९०० रुपये असा एकूण १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधी दिला जाणार असल्याने गावपातळीवर तलाठ्यांमार्फत संबंधित शेतकºयांकडून बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. संबंधित शेतकºयांना तहसिल कार्यालयातदेखील बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती देता येणार आहे. बँक खाते व आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तातडीने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी