शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

चिमुकले जपताहेत बंजारा समाजातील ‘भजन’ परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:34 IST

वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.

ठळक मुद्देपिंप्री मोडक येथे पूर्वीपासून सेवालाल महाराज संस्थानवर हजेरी लावून बंजारा भजन व आरती केली जाते. मध्यंतरीच्या काळात भजन व आरतीसाठी येणाºयांची संख्या कमी झाली होती.भजन परंपरेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करीत दररोज रात्री ८ वाजता आरती करण्याचा एकमताने निर्णय  घेतला.

 वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. गावातील सेवालाल महाराज संस्थान येथे दररोज रात्री ८ वाजता स्वयंस्फुर्तीने हजेरी लावत चिमुकली मुले भजन व आरती करतात.पिंप्री मोडक येथे पूर्वीपासून सेवालाल महाराज संस्थानवर हजेरी लावून बंजारा भजन व आरती केली जाते. मध्यंतरीच्या काळात भजन व आरतीसाठी येणाºयांची संख्या कमी झाली होती. ही परंपरा लोप पावते की काय? अशी शंकाही व्यक्त केली जात होती. दरम्यान, यावर्षी सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १० ते १५ वयोगटातील चिमुकल्यांनी पूर्वजांच्या भजन परंपरेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करीत दररोज रात्री ८ वाजता आरती करण्याचा एकमताने निर्णय  घेतला. हा निर्णय अंमलात आणत दररोज रात्री ८ वाजता न चुकता स्वत:हून सेवालाल महाराज संस्थानवर हजेरी लावत बंजारा भजन तसेच आरती घेतली जाते. गावातील अनुराग राठोड, प्रदिप आडे, मयुर जाधव, रोशन जाधव, दिपक राठोड, हर्षल जाधव, कुनाल जाधव, अमोल राठोड, सुचित आडे,अभय जाधव, रोहन राठोड, मंगेश जाधव, मनिष जाधव,  आशिष जाधव, गौरव जाधव, राजेश राठोड, अजय चव्हाण, सुचित चव्हाण, आकाश चव्हाण, श्याम किरसान,नंदु आडे, सुरज राठोड, रितीक राठोड, पवन चव्हाण, तुशार चव्हाण यांच्यासह गावातील मुलांनी यासाठी स्वंयस्फुर्तीने पुढाकार घेतला आहे. तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विकास  राठोड, ग्राम पंचायत सदस्य गजानन राठोड, आशिष राठोड, विलास जाधव, वसंतराव राठोड, भाष्कर राठोड, छगन जाधव, विष्णू जाधव, रामदास राठोड, निखिल राठोड, अक्षय किरसान, प्रेम राठोड आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा