शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

बांबर्डावासी सहा दिवसांपासून अंधारात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:19 IST

बांबर्डा कानकिरड:  कामरगाव ३३ के व्ही. अंतर्गत येत  असलेल्या ग्राम बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवर  अदलून-बदलून बसविण्यात आलेले तिन्ही रोहित्र  जळाल्याने या ठिकाणी सहा दिवसांपासून अंधारात गावकरी  विविध समस्यांचा सामना करीत आहेत.

ठळक मुद्देतीन रोहित्र जळालीविजेअभावी गावकरी करताहेत विविध समस्यांचा सामना 

लोकमत न्यूज नेटवर्क बांबर्डा कानकिरड:  कामरगाव ३३ के व्ही. अंतर्गत येत  असलेल्या ग्राम बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवर  अदलून-बदलून बसविण्यात आलेले तिन्ही रोहित्र  जळाल्याने या ठिकाणी सहा दिवसांपासून अंधारात गावकरी  विविध समस्यांचा सामना करीत आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी बांबर्डा कानकिरड येथील गावठाण  फिडरवरील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा  खंडित झाला होता. त्याबाबतचा अहवाल कामरगाव ३३ के  व्ही. उपकेद्रांच्या अभियंत्यांनी कारंजा येथील महावि तरणच्या उपविभागीय कार्यालयाला कळविल्यानंतर संबंधित  कार्यालयाकडून येथे ६३ एच पी. क्षमतेचे रोहित्र बसविण्यात  आले; परंतु त्यावरून वीजपुरवठा सुरळीत होण्यापूर्वीच ते  रोहित्र जळाले. त्यानंतर अशाच प्रकारचे दोन रोहित्र बदलून  बसविण्यात आले; परंतु ते रोहित्रही गावातील वीजपुरवठा  सुरळीत होण्याआधीच जळाले. त्यामुळे गेल्या सहा दिवसां पासून सदर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, दिवसा  विजेअभावी गावकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा  लागत आहे. त्यातच वीजपुरवठा बंद असल्याने येथे कृत्रिम  पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागत आहे.   प्रत्यक्षात महावितरणच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी वारंवार  रोहित्र का जळत आहेत, त्या कारणांचा शोध घेण्यासाठी  वीज वाहिनीची पाहणी करणे आवश्यक होते; परंतु गावा तील लाइनमन वगळता एकाही वरिष्ठ अधिकार्‍याकडून  त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तीन रोहित्र जळून शासनाचे नुकसान झालेच शिवाय  गावकर्‍यांना वीजपुरवठय़ाअभावी गेल्या ६ दिवसांपासून  अंधाराचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमची  दूर करण्यासाठी गावकर्‍यांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांना   वारंवार वाढीव भाराचे रोहित्र देण्याची मागणी केली; परंतु  अधिकार्‍यांनी त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून ६३ एच पी  चे ट्रान्सफार्मर  बसवित आपल्या उदासीन धोरणाचे दर्शन  घडविले. या ठिकाणच्या समस्यांची दखल घेऊन वरिष्ठ  अधिकार्‍यांनी १00 एचपी क्षमतेचे रोहित्र बसवावे, अशी  मागणी गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे. 

गावात कृत्रिम पाणीटंचाईगेल्या काही दिवसांत बांबर्डा येथील तीन रोहित्र जळाल्याने  सहा दिवसांपासून गावकरी अंधारातच रात्र काढत असताना  वीजपुरवठा खंडित असल्याने गावाची पाणीपुरवठा योजना  प्रभावित झाली असून, गावकर्‍यांना कृत्रिम पाणीटंचाईचा  सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी असतानाही  गावकर्‍यांना पाणीपुरवठा होत नसल्याने गावकरी शेतामधून  पाणी आणून आपल्या गरजा भागवित असल्याचे चित्र या  ठिकाणी पाहायला मिळत आहे.

अधिकार्‍यांचा प्रतिसाद नाहीबांबर्डा येथील तीन रोहित्र जळाल्याने सहा दिवसांपासून  गावकरी अंधारातच रात्र काढत असताना या ठिकाणी  रविवारी रोहित्र बसविणार असल्याचे वाशिम येथील वरिष्ठ  अधिकार्‍यांनी सांगितले; परंतु त्यावर कार्यवाहीच झाली  नसल्याने या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून  माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांच्याकडून  प्रतिसाद न मिळाल्याने माहितीच प्राप्त होऊ शकली नाही.