शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या हस्तकांनी बालाजी कारखाना बंद पाडला - राजू शेट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:39 IST

श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी  यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा (वाशिम) - रोजगार निर्मिती, शेतकºयांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. केशवनगर येथील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असून, हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी  यांनी केशवनगर येथे १८ सप्टेंबर रोजी केले.बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केशवनगर येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सुनील धाबेकर, डॉ.चौधरी, जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोेले आदि उपस्थित होते. शेटटी म्हणाले की, रोजगार निर्मिती, शेतकºयाला शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. म्हणुन हा कारखाना चालु होणे आवश्यक आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असुन त्याचा लिलाव काढला आहे. परंतु काही सभासदांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे लिलाव झाला नाही आणि न्यायालयाचा निकालही झाला नाही. त्यामुळे कारखाना १९ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. तो चालु करण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून न्यायालयीन प्रकरणे सामोपचाराने मिटवावी लागणार आहेत. कारखाना विकणे फायदाचे नाही. यावेळी बालाजी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचा संदेश घेवुन त्यांचे पुत्र सुनिल धाबेकर उपस्थित होते. हा संदेश सरपंच सुमन गालट यांनी वाचुन दाखविला. या संंदेशात म्हटले की, जंगल असलेल्या ठिकाणी कारखान्याची नोंदणी झाल्यापासुन ३९ महिन्यात उभा राहिलेला, १२५० मेट्रीक टन गाळप क्षमता असताना २३०० ते २४०० टन गाळप करणारा, दोन वेळा सुवर्णपदक मिळविणारा, पहिल्या तीन वर्षात कर्ज परतफेड करणारा विदर्भातील पहिला कारखाना म्हणुन बालाजीने नावलौकीक मिळविला होता. परंतु याच भागातील काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांनी कर्मचाºयांत फुट पाडून संप आंदोलने सुरु केली. अनेक कारखान्यांकडे २०० ते ३०० कोटी रुपये कर्ज असतांना केवळ १८ कोटी कर्जासाठी त्रास देण्यात आला. हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले. यावेळी रविकांत तुपकर, रसिका ढगे यांनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRaju Shettyराजू शेट्टी