शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 15:07 IST

वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत.

ठळक मुद्दे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे.एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविणे इत्यादि बाबींसाठी लोकांना भावनिक आवाहन केले  जात आहे.

वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे व नुकसानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.गणेशोत्सव  आला म्हणजे आबाल वृद्धांना चाहूल लागते ती लाडक्या गणेशाच्या आगमनाच्या तयारीची . बच्चे कंपनीला तर त्यात विशेष रस पण त्यासाठी प्लास्टर  आॅफ पॅरीस ,थर्माकालच्या वाढत्या वापराने नदया व तलाव प्रदूषित होत आहेत .या सर्व बाबीचा विचार करुन स्थानीक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रीय हरीत सेनेचे  शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व प्राचार्य मीना उबगडे तसेच शाळेतील शिक्षिका  भारती गटलेवार यांच्या मार्गदर्शनात शाडूमातीच्या गणपती निर्माण करण्याची कार्यशाळा घेतली. तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. त्यात प्लास्टर आॅफ पॅरीस ऐवजी शाडुची गणेश मुर्ती वापरणे  किंवा तयार करणे , शाडू सहजतेने उपलब्ध नसल्यास पेपर किंवा पेपर मँशचा गणपती तयार करणे ,मुतीर्साठी रासायनीक रंगाऐवजी नैसर्गिक रंग वापरणे , सजावटीसाठी प्लास्टिक ,थर्माकॉल ऐवजी कागदाचा लगदा ,कापड ,लाकुड वापरणे ,मुर्तीचीे नदी ऐवजी हौद किंवा टाक्यामध्ये विसर्जन करणे, .निर्माल्याचे नदीत विसर्जन न करता त्याचे कंपोस्ट खतात रूपातर करणे ,ध्वनीक्षेपकाचा आवश्यक तेवढा व कमी प्रमाणात वापर करणे , शक्य तेथे एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविणे इत्यादि बाबींसाठी लोकांना भावनिक आवाहन केले  जात आहे. सदर उपक्रमला हरीत सेनेचे विद्यार्थी विवेक बोरकर , सर्वेज्ञ आरू , ओम नागुलकर , नेहा वानखेडे , आरती वाझुळकर , रिझा हुसेन , श्रद्धा धुत , नेहिका गुप्ता , यश शिंदे , अनुष्का कावरखे , यश मावस , खुशी चौधरी , वजीरा खंडारे , पौर्णिमा डोंगरे , स्वरूपा सुरूशे , आर्या मालस ,पिया सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. शाळेत तयार केले निर्माल्य कलशउल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय हरीतसेनेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात  शाळेमध्ये निर्माल्य कलश तयार केला असुन शाळेतील विद्यार्थींच्या घरचे व परिसरातील निर्माल्य या कलशात एकत्रीत करुन याचे कंपोस्ट खतात रुंपातर करून शाळेच्या परीसरातील रोपवाटीकेसाठी याचा वापर करण्यात येणार आहे .

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सव