शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गायरानवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:59 IST

पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्यामुळे १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील शासनाच्या ई क्लास जमिनीवील अतिक्रमण काढण्यासाठी ग्राम पंचायतने रितसर बाबी पुर्ण करीत पोलीस बंदोबस्त मागितला आहे. मात्र, अद्याप पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्यामुळे १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी दिला.कारखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक नागरिकांनी शासनाच्या ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे. काहींनी या जमिनीवर ताबा केला तर काहींनी वीटभट्ट्यांची दुकानदारी सुरू केली. यामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्राम पंचायतने रितसर मासीक सभेचे ठराव, ग्रामसभेचे ठराव घेतले तसेच अतिक्रमकांना नोटीसही बजावली. मात्र, अतिक्रमण काढण्यात आले नाही. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला तसेच यासंदर्भात २७ आॅगस्ट ते ५ आॅक्टोबर या दरम्यान पाच वेळा पत्रव्यवहारही केला. परंतू, पोलीस बंदोबस्तही मिळाला नाही.पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी केला.  दोन दिवसात पोलीस बंदोबस्त दिला नाही तर १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराPoliceपोलिस