शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीक नुकसानाची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:06 IST

नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी(वाशिम) :  मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर गेला. यात नाल्याच्या काठावरील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. आता या नुकसानापोटी पीकविमा मिळावा म्हणून शेतकरी शासनाच्या पीकविमा प्रतिनिधींकडे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्यशासनासह कृषी विभागाकडून प्रधारनमंत्री पीक विमा योजना  ही शेतकºयांसाठी वरदान असल्याचा गाजावाजा केला जातो. त्यावर विश्वास ठेवून लाखो शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवितात. त्यासाठी नियमानुसार रकमेचा भरणाही करतात. यंदाही जिल्ह्यातील लाखावर शेतकºयांनी दिल्ली येथील अ‍ॅग्रीकल्चर कंपनीकडे पीकविमा काढला. त्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील शेकडो शेतकºयांचा समावेश आहे. पीकविमा योजनेच्या नियमानुसार शेतकºयांच पिकांचे नैसर्गिक आपत्तीने अतोनात नुकसान झाल्यानंतर त्याची पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून पाहणी केली जाते. त्यासाठी शेतकºयांना पीकविमा कंपनीकडे ठरलेल्या मुदतीत तक्रारही नोंदवावी लागते. आता २६ आणि २७ सप्टेंबर रोजी इंझोरी परिसरातील नाल्याला मोठा पूर गेला. त्यामुळे या नाल्याच्या काठावरील अनेक शेतकºयांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. अनेक शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पीकविमा कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर शेतकºयांनी या संदर्भात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; परंतु वारंवार प्रयत्न करूनही टोलफ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आनंद तोतला या शेतकºयाचा टोलफ्री क्रमांकावर संपर्क झाला; परंतु त्यांनी पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याची तक्रार केली असता, वेळ नसल्याचे सांगून तक्रार नोंदविण्यास प्रतिनिधीने नकार दिला.

शेतकºयांची पीक नुकसानाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असेल, तर संबंधित तालुका समन्वयकांवर नियमानुसार कारवाई करू, तसेच शेतकºयांच्या तक्रारी तातडीने नोंदवून घेण्याची व्यवस्था करू. -ज्ञानेश्वर बोदडेजिल्हा समन्वयकअ‍ॅग्रीकल्चर इंन्शूरन्स कंपनी नवी दिल्ली

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी