मानोरा/मालेगाव: मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत रविवारी सरासरी ७0 टक्के मतदान झाले. मालेगावात १७ हजार १६७ पैकी ११ हजार ९६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ६९.७0 आहे. मानोर्यात ७ हजार २0४ मतदारांपैकी ५ हजार ३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, टक्केवारी ७0 टक्के आहे. मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी एकूण ३५ मतदान केंद्रावर रविवारी मतदान झाले. मालेगाव येथे १७ जागेसाठी ९२ उमेदवार निवडणुकीत मैदानात होते. वार्ड एकमध्ये ६२४ पैकी ३४९ मतदान झाले असून, टक्केवारी ५५.९२ आहे. वार्ड दोनमध्ये ६७६ पैकी ५२२ मतदान झाले टक्केवारी ७७.२१ आहे. वार्ड तीनमध्ये ८५0 पैकी ७५३ मतदान झाले असून, टक्केवारी ६५.५ आहे.
सरासरी ७0 टक्के मतदान
By admin | Updated: January 11, 2016 01:47 IST