शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:13 IST

हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्यात आले असून यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्यूत पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’व्दारे पंप सुरू करता यावा, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी मोटारपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्याचा प्रकार अवलंबिला आहे; मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘ऑटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सद्या ग्रामीण भागात ठराविक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विजपुरवठा सुरळित होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटव्दारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरूस्त होत असल्याने मोटारपंपाचे ‘ऑटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविलेले आहेत. अधूनमधून खंडित होणारा वीज पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर ‘ऑटो स्विच’व्दारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मोटारपंप सुरू होत असल्याने रोहित्रावर ताण येऊन ते जळण्याचा प्रकार वाढला आहे. शेतकºयांनी ‘ऑटो स्विच’ काढून टाकायला हवे.- व्ही.बी. बेथारिया,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण