शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात आॅटोरिक्षाच्या ठिय्यामुळे एसटी चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:48 IST

शिरपूर जैन (वाशिम):  मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम):  मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. या वाहनांच्या दाटीमुळे अडचणीतून बस वळविताना किरकोळ अपघात घडत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत. ही समस्या निकाली काढण्याची मागणी रिसोडच्या आगार व्यवस्थापकांनी शिरपूर पोलिसांकडे १५ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे जवळपास २५ हजार लोकसंख्येचे गाव आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथून दरदिवशी हजारो प्रवासी विविध ठिकाणाहून आवागमन करीत असतात. शिरपूर बसस्थानक हे रिसोड आगारांतर्गत येते. त्यामुळे येथे येणाºया भाविकांची संख लक्षात घेऊन आगाराच्यावतीने २५ बसफेºयांची सुविधाही ठेवली आहे. दर ४५ मिनिटांनी या बसफेºयांची वाहतूक सुरू असते. शिरपूर बसस्थानक परिसरात या बसफेºया नेआण करीत असताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. बसस्थानकासमोरच आॅटोरिक्षा आणि इतर वाहने उभी राहत असल्याने चालकांना बस वळविणेच कठीण जाते. या संदर्भात बसचालकाने संबंधित वाहनधारकास वाहन बाजूला करण्याची विनंती केली, तर ते वाद घालून अर्वाच्च भाषेत संवाद साधतात, तर दाटीतून बस काढताना किरकोळ अपघात घडतो. त्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. याचा त्रास प्रवाशांनाही होतो. तेव्हा चालक आणि प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आॅटोरिक्षा व इतर वाहनांना निश्चित वाहनतळाची व्यवस्था करून ही समस्या दूर करावी, अशी मागणी रिसोडच्या आगार व्यवस्थापकांनी शिरपूरच्या ठाणेदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन