शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न - षण्मुगराजन एस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 17:21 IST

Washim Collector Shanmugarajan S. News प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १० दिवसांपूर्वी वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून षण्मुगराजन एस. यांनी सूत्रे स्विकारली. कोरोना नियंत्रणाबरोबरच महसूल वाढीसाठी आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

कोरोना आणि जिल्ह्याची स्थिती याबाबत काय सांगाल?जिल्ह्यात सध्या कोरोनाचा आलेख घसरलेला आहे, ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. तथापि, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रुमालचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. उपलब्ध कोरोना बेडसंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी म्हणून संकेतस्थळावर ही माहिती नियमित अपलोड केली जाते. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सज्ज आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावे.

फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी?यंदा कोरोनामुळे सण, उत्सवावर काही निर्बंध आले. नागरिकांनी साधेपणाने सण, उत्सव साजरे करून कोणत्याही शासकीय नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. दरवर्षी दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी होते. यावर्षी फटाक्यांची आतषबाजी तसेच फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम हा कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष देऊन फटाक्यांची आतषबाजी टाळावी. यावर्षी फटाके फोडण्याचे टाळून त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

महसूल वाढीसाठी काय उपाययोजना आहेत?आता कोरोना आलेख कमी होत आहे. लवकरच आढावा बैठक घेऊन महसूल वाढीसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. शासनाकडून मिळालेले महसूल उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासंदर्भात काय सांगाल?नागरिकांची कामे वेळेत होतील, यादृष्टिने प्रशासकीय यंत्रणांनी कामकाज करावे, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. एकमेकांशी समन्वय साधून सर्व यंत्रणांनी प्रशासकीय कामकाज सुलभ व गतिमान करण्याला प्राधान्य द्यावे तसेच कर्तव्यात दिरंगाई करणाºया, विहित मुदतीत काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणाºयांची गय केली जाणार नाही.सर्वसामान्य जनतेची कामे लवकरात लवकर निकाली कशी निघतील तसेच जिल्हा विकासाच्या दृष्टिने काय करता येईल, याला प्राधान्य दिले जाईल. यापूर्वी जे काही चांगले उपक्रम राबविले असतील, ते यापुढेही सुरू ठेवले जातील. नागरिकांनीदेखील जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय