शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवकावर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना दोन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:08 IST

वाशिम : रस्त्यावरील वाहने बाजूला घ्या, असे का म्हटले म्हणून चौघांनी संगनमत करून वसीम पठाण (रा. भवानी नगर, वय ३५) या युवकास लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शिवाजी पोलीस चौकीशेजारी असलेल्या भवानी नगरमधील देशी दारूच्या दुकानानजिक ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना ८ एप्रिल रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देवाशिम येथील प्रकरण हल्ल्यातील युवकाची प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्त्यावरील वाहने बाजूला घ्या, असे का म्हटले म्हणून चौघांनी संगनमत करून वसीम पठाण (रा. भवानी नगर, वय ३५) या युवकास लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शिवाजी पोलीस चौकीशेजारी असलेल्या भवानी नगरमधील देशी दारूच्या दुकानानजिक ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना ८ एप्रिल रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.भवानी नगर परिसरात वास्तव्य असलेले वसीम पठाण रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनाने घरी परत जात होते. यादरम्यान राठोड यांच्या देशी दारूच्या दुकानासमोरील रस्त्यावर ग्राहकांनी आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने पठाण यांनी वाहने रस्त्याच्या बाजूला घ्या, असे म्हटले. त्यानंतर गणेश ठेंगडे, आकाश इंगळे, प्रल्हाद ठेंगडे (सर्व रा. भवानी नगर) या तिघांनी संगनमत करून वसीम पठाण याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केले. वसीम पठाणला वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथे रवानगी करण्यात आली. अकोला येथील खासगी रुग्णालयात पठाणवर उपचार सुरू असून, प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पोलीस चौकीचे जमादार नितीन काळे, धनंजय अरखराव, सतीश गुडदे, विष्णू बोंडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण आणले. या घटनेची फिर्याद अफसरखाँ हैदरखाँ यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून नमूद तीनही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शहरात अफवांचा बाजार भवानी नगर येथे घटना घडल्यानंतर दोन समुदायात दंगल घडल्याची अफवा वाºयासारखी पसरली. एवढेच नव्हे तर दोघांचा खून झाल्याचीही चर्चा शहरात चांगलीच रंगू लागली. परंतु, ही सर्व अफवा असून, काही समाजकंटक शहरामधील शांततेचे वातावरण भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलीस प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwashim City police stationवाशिम शहर पोलीस स्टेशन