शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात दान केलेल्या पैशाच्या कारणावरून पंजाब महाराजांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:47 IST

गंभीर जखमी अवस्थेत पंजाब महाराज यांना उपचारार्थ दिग्रस येथे दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील उमरीखुर्द येथील प्रसिद्ध असलेल्या शामकीमाता मंदिरासमोर पौर्णिमेनिमित्त दान केलेल्या पैशाच्या कारणावरून पंजाब राठोड उर्फ पंजाब महाराज यांची हत्या झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. राहुल अजाबराव राठोड (२८) रा. उमरीखुर्द यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी सचिन उल्हास राठोड हा उमरीखुर्द येथील शामकीमाता मंदिरासमोर उभा होता. पौर्णिमा असल्यामुळे उमरी येथे आलेले भाविक बंद असलेल्या मंदिरामध्ये पैसे दान करीत होते. आरोपी हा दान केलेले पैसे घेत असल्याने, मंदिरावर अधिकार नसल्याने या प्रकाराला फिर्यादीने आक्षेप घेताच आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करीत जिवाने मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर आरोपी हा आपले नातेवाईक सुनील विलास राठोड, दिलीप शेषराव राठोड, पवन दिलीप राठोड यांच्यासह हातात लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीचे घरासमोर आले. फिर्यादीचे मोठे वडील पंजाब उत्तमराव राठोड यांनी भांडण करू नका असे म्हणताच, आरोपी सचिन राठोड याने लोखंडी रॉडने पंजाब महाराज यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत पंजाब महाराज यांना उपचारार्थ दिग्रस येथे दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला व इतरांनादेखील यावेळी मारहाण करण्यात आलीे. घटनेची माहिती प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण,  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटकर, आसेगावचे पोलीस निरीक्षक लष्करे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी रात्रीच चारही आरोपीला अटक करण्यात  आली. याप्रकरणी आरोपी सचिन उल्हास राठोड,  सुनिल विलास राठोड,  दिलीप शेषराव राठोड,  पवन दिलीप  राठोड  यांच्या विरूध्द कलम ३०२,३०७ , ४५२ , ३२३, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी