शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्तातर्फे शहरात बनताहेत तब्बल ७१ हजार माेतीचूर लाडू!

By नंदकिशोर नारे | Updated: January 19, 2024 13:57 IST

निमित्त राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळयाचे : संपूर्ण शहरात केले जाईल वाटप

वाशिम : अयाेध्या येथे प्रभू रामचंद्र मंदिर  प्रांण प्रतिष्ठापनान सोहळ्यानिमित्त रामभक्त संतोष  शिंदे यांच्याकडून तब्बल ५१ हजार मोतीचूर लाडूचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला हाेता. ते आता ७१ हजार लाडुचे वाटप करणार असून लाडू बनविण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. याकरिता २७ क्विंटल पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये साखर, बेसन, तेल, विलायची, काजू, किसमिस, कलर आदिंचा समावेश आहे.अयाेध्या येथील श्री राम मंदिरात स्थापन हाेत असलेल्या राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा साेहळ्यानिमित्त संपूर्ण जिल्हयात कलश रथ यात्रेद्वारे एकीकडे अक्षता वाटप करण्यात येत आहे, तर काही जणांकडून शहरात विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. रामभक्त तथा भाजपाचे शहराध्यक्ष संताेष शिंदे यांनी तब्बल ७१ हजार लाडू तयार करुन ते शहरातील प्रत्येक वार्डासह मंदिरात वाटप करण्याचा संकल्प केला. वाशिम शहरातील देवपेठ येथील विठ्ठल मंदिरात गत तीन दिवसांपासून लाडू बनविण्याचे काम सुरु असून ते अंतीम टप्प्यात आले आहे. याकरिता एकूण आचाऱ्यासह ४६ जण लाडू बनविण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. याकरिता जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत खर्च हाेत असल्याचे सांगण्यात आले.  २२ जानेवारी राेजी याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील रामभक्त परिश्रम घेत आहेत.

लाडूसाठी लागत असलेले साहित्यसाखर १४ क्विंटलबेसन ७ क्विंटलतेल ७० किलाेविलायची ५ किलाेकाजू ५० किलाेकलर व इतर साहित्यगॅस सिलिंडर ५० टाकी

माणसे ४६महिला  ३०पुरुष  १६

अयाेध्येमध्ये श्री राम मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा हे माेठी आनंदाची बाब असून आपणही यामध्ये काही तरी वाटा नाेंदवून याचे साक्षिदार बनावे यासाठी आपण हे करीत आहे.संताेष शिंदे, श्रीरामभक्त, वाशिम

राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळयानिमित्त माेतीचूर लाडू बनविण्याचे काम मिळाले असून एका भव्य कार्यक्रमासाठी काम करण्याचे समाधान मिळत आहे. यापूर्वी आपल्या कधीच एवढे माेठे काम मिळाले नाही.विशाल शर्मा, आचारी

टॅग्स :washimवाशिम