शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 15:57 IST

फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : शहरातील काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अनेक लघुव्यावसायिकांसह भाजीविक्रेत्यांना व्यवसाय कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अतिक्रमण काढल्यानंतरही पुन्हा काही दिवसानंतर फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रीयेच्या हालचालींना प्रारंभ झाला असून जागेची पाहणी सुध्दा करण्यात आली आहे.वाशिम शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम मोठया प्रमाणात करण्यात येत असून पुन्हा अतिक्रमण होवू नये याकरिता दररोज अतिक्रमण हटविल्या जागेची पाहणी करुन पुन्हा अतिक्रमण झाले  का याची पाहणी नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येत आहे. तरी सुध्दा काही लघुव्यावसायिक, फेरीवाले रस्त्यावर उभे राहत असून अतिक्रमण पथक आल्यानंतर तेथून पळून जात आहेत. ही नेहमीची कटकट दूर करण्यासाठी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सद्यस्थितीत उपयोगात नसलेले व भव्य जागा असलेल्या टिळक बागेचा वापर लघुव्यावसायिकांसाठी व्हावा याकरिता प्रयत्न चालविले आहेत. २० व २१ डिसेंबर रोजी टिळक बागेची पाहणी करुन कोणत्या ठिकाणी कोणाला बसवावे यावर विचार विनीमय करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी अग्रवाल, इंजिनिअर राजेश घुगरे, कर निरिक्षक शेख अजिज शेख सत्तार, पाणी पुरवठा विभागाचे सोनुने, साखरकर, शहर वाहतुक शाखा निरिक्षक राजु वाटाणे, जितु बढेल आदिंची उपस्थिती होती. वाशिम शहरात पुन्हा अतिक्रमण उभे राहू नये. शहर स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता नगरपरिषदेच्यावतिने प्रयत्न करण्यात येत आहेत. वाशिम येथील टिळक गार्डनचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा याकरिता येथे लघुव्यावसायिकांना जागा देण्याचा विचार सुरु आहे. लवकरच हा निर्णय घेऊन यामध्ये लघुव्यावसायिकांना व्यवसायाकरिता जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधितांशी चर्चा होत आहे. असे झाल्यास शहरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही.- दीपक मोरे,  मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिम