शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आरोग्यवर्धिनी केंद्रातील फर्निचरची जिल्हास्तरावरच होणार खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:46 IST

वाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्र व ९४ उपकेंद्र तसेच अमरावती जिल्ह्यातील ११ आरोग्य केंद्र व ४८ उपकेंद्रांचा समावेश आहे.

- संतोष वानखडेवाशिम : राज्यातील १९ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या फर्निचरची खरेदी करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाने १२ जून रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असून, त्यानुसार जिल्हास्तरावर या फर्निचरची खरेदी होणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्र व ९४ उपकेंद्र तसेच अमरावती जिल्ह्यातील ११ आरोग्य केंद्र व ४८ उपकेंद्रांचा समावेश असून, आवश्यक तेवढा निधीही मिळणार आहे.केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत राज्यात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डिसेंबर २०२२ पर्यंत रुपांतरण केले जाणार आहे. यासाठी राज्यात टप्प्याटप्प्याने १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्र व १० हजार ६६८ उपकेंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतरीय होणार आहेत. या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील २५०४ उपकेंद्र व २८७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या फर्निचरची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी खरेदीची ही प्रक्रिया राज्यस्तरावरून केली जात होती. १२ जून २०२० रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने यामध्ये बदल केला असून, आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या स्तरावर कार्यकारी समिती, जिल्हा आरोग्य सोसायटी यांच्या मान्यतेने प्रचलित खरेदी धोरणानुसार फर्निचरची खरेदी करणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी खुर्च्या व टेबल, रुग्णांसाठी तपासणी टेबल, आलमारी, स्टेनलेस स्टील स्टूल, लॅब टेबल, प्रतिक्षालयात रुग्णांसाठी बेन्च आदी फर्निचरसाठी जिल्हानिहाय निधीलादेखील मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार अमरावती विभागात वाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्रातील फर्निचरसाठी २० लाख ८ हजार ७७६ रुपये तर ९४ उपकेंद्रातील फर्निचरसाठी १ कोटी २४ लाख १६ हजार ९३४ रुपयांचा निधी मिळणार आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील ११ आरोग्य केंद्रातील फर्निचरसाठी आठ लाख ८३ हजार ८६१ रुपये आणि ४८ आरोग्य उपकेंद्रांतील फर्निचरसाठी ६३ लाख ४० हजार ५६२ रुपयांचा निधी मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिम