शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांच्या मानधनाला मंजुरी द्या; अन्यथा आंदोलन - विदर्भ लोककला मंचचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 20:07 IST

वाशिम - वृध्द लोक कलावंत समितीच्या वार्षिक बैठकीवरील स्थगिती उठवून लोककलावंतांना मानधन मंजुर करण्याचे मागणी विदर्भ लोककला मंचच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वात  जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन पाठवून, या मागणीसाठी येत्या २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर लोक कलावंतांच्या धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

ठळक मुद्देविदर्भ लोककला मंचचे पालकमंत्र्यांना निवेदनवार्षिक बैठकीवरील स्थगिती उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम - वृध्द लोक कलावंत समितीच्या वार्षिक बैठकीवरील स्थगिती उठवून लोककलावंतांना मानधन मंजुर करण्याचे मागणी विदर्भ लोककला मंचच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वात  जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन पाठवून, या मागणीसाठी येत्या २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर लोक कलावंतांच्या धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.विदर्भ लोककला मंचकडून असा युक्तीवाद करण्यात आला आहे की, शाहीर, शिवशाहीर, भिमशाहीर, गायक, गीतकार, भजनी कलावंत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, भराडी, बंजारा, नाथजोगी इत्यादी पारंपारिक लोककलावंत आयुष्यभर जनजागृती राष्ट्रीय एकात्मता व समाजप्रबोधन करीत असतात. प्रबोधन करुनही त्यांची झोळी सदैव रिकामीच असते. या कलावंतांना शासनाने समाजकल्याण विभागामार्फत वृध्द साहित्यीक कलावंत मानधन समितीच्या माध्यमातून निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र पालकमंत्री यांच्याकडे खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शासनाने या समितीच्या वार्षिक बैठकीवर स्थगिती आणली आहे. मात्र बालपणापासुन वृध्दापकाळापर्यंत समाजाला समर्पित असलेल्या लोककलावंतांची उपासमार लक्षात घेवून वृध्द साहित्यीक कलावंत समितीची २०१७ च्या वार्षिक बैठकीवरील बंदी उठवावी व पालकमंत्र्यांनी आपल्या उपस्थितीतच वृध्द साहित्यीक कलावंत समितीची बैठक घेवून तळागाळातील, ग्रामीण भागातील, दारिद्क्चय रेषेखालील गरजु व योग्य अशा स्त्री, पुरुष लोकांना समसमान वाटा देवून कलावंत मानधन मंजुर करुन लाभार्थ्यांची निवड करावी व दुर्धर आजारग्रस्त व गरजु कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच येत्या सोमवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर विदर्भ लोककला मंच नागपूरचे अध्यक्ष दत्तराव धांडे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन राबवून लोककलावंतांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. असे जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिम