शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या तीन वसतिगृह बांधकामाची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:36 IST

वाशिम - सुयोग्य जागेचा अभाव, उच्च शैक्षणिक तसेच उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची अपूरी उपलब्धता या कारणास्तव मालेगाव, कारंजा व मानोरा येथील अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित वसतिगृह इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता अल्पसंख्याक विकास विभागाने ११ जानेवारी रोजी रद्द केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम - सुयोग्य जागेचा अभाव, उच्च शैक्षणिक तसेच उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची अपूरी उपलब्धता या कारणास्तव मालेगाव, कारंजामानोरा येथील अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित वसतिगृह इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता अल्पसंख्याक विकास विभागाने ११ जानेवारी रोजी रद्द केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, निकषात बदल करून ही मान्यता रद्द करू नये, अशी मागणी पुढे आली आहे.अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या गठित शक्तीप्रदान समितीने ३० जानेवारी २०१३ रोजीच्या ६४ व्या बैठकीत केंद्र पुरस्कृत बहूक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव व मानोरा येथे अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी १०० प्रवेश क्षमतेची एकूण तीन वसतिगृहे बांधकामाच्या प्रत्येकी ३.१० कोटी अशा एकूण ९ कोटी ३० लाख रुपये रकमेच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर १ जानेवारी २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. ३१ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार पहिल्या हप्त्यातील निधीही वितरीत झालेला आहे. या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू असताना, २१ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या पाहणीदरम्यान केंद्र पुरस्कृत बहूक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव व मानोरा येथे एकूण तीन वसतिगृह इमारत बांधकामासाठी सुयोग्य जागेची उपलब्धता झाली नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कारंजा येथे वसतिगृह बांधकामासाठी निवडण्यात आलेली जागा ही लोकवस्तीपासून दूर व दुर्गम भागात असल्याने तसेच उपरोक्त तिनही ठिकाणी उच्च शैक्षणिक तसेच उच्च व्यावसाकि शैक्षणिक संस्थांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्याने प्रस्तावित वसतिगृहांमध्ये प्रवेश क्षमतेएवढी विद्यार्थिनींची संख्या उपलब्ध होणार नाही, असे अनुमान काढण्यात आले. या कारणास्तव या तिनही वसतिगृह बांधकामाकरीता देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीने २५ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या मान्यतेस अनुसरून या तिनही वसतिगृह इमारत बांधकामाला यापूर्वी दिलेल्या प्रशासकीय मान्यता अल्पसंख्याक विभागाने ११ जानेवारी रोजी रद्द केली आहे. दरम्यान या निर्णयामुळे आता प्रस्तावित वसतिगृह होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  

वसतिगृह बांधकामासाठी जागा तसेच उच्च शिक्षण व व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नाही, ही कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. निकषात बदल करून जिल्ह्यात प्रस्तावित तिनही वसतिगृह साकार होतील, या दृष्टिने विचार होणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल.-अमित झनक, आमदार,

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाManoraमानोरा