लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: तहसील कार्यालय वाशिम अंतर्गत पार पडलेल्यासंजय गांधी निराधार योजना समितीत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या मिळून एकूण १७० प्रकरणांंना मंजुरी देण्यात आली, तर त्रुटींमुळे ७६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संगानियो समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण हे होते. यावेळी नायब तहसीलदार नप्ते, संगानियो सदस्य गजानन गोटे, प्रल्हाद गोरे, भगवान कोतीवार, विनोद मगर, धनंजय हेंद्रे, पवन जोगदंड, कल्पना खामकर यांची उपस्थिती होती. यावेळी पात्र लाभार्थ्यांनी श्रावणबाळ योजनेची १५३ व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ९३ प्रकरणे दाखल केली होती. या प्रकरणांची बारकाईने तपासणी केली असता श्रावण बाळ योजनेतून ११३ लाभार्थींच्या प्रकरणांना समिती सदस्यांनी मंजुरी दिली, तर ४० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. संजय गांधी योजनेंतर्गत ५७ अर्जांना मंजुरात देण्यात आली, तर ३६ अर्ज नामंजूर करण्यात आलो. मंजूर केलेल्या आणि नामंजूर केलेल लाभार्थींच्या याद्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी आपली नावे तपासून आवश्यक ती कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून द्यावी, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे त्रुटीत असतील त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रची पूर्तता करावी. या प्रकरणांना पुढील बैठकीत मंजुरात देण्यात येईल, असे समिती अध्यक्ष शरद पाटील चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी संजय गांधी निराधार योजना समिती कार्यालयाचे लिपिक गायकवाड, किल्लेदार यांनी परिश्रम घेतले.
वाशिममधील निराधार लाभार्थींच्या १७० प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:10 IST
वाशिम: तहसील कार्यालय वाशिम अंतर्गत पार पडलेल्यासंजय गांधी निराधार योजना समितीत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या मिळून एकूण १७० प्रकरणांंना मंजुरी देण्यात आली, तर त्रुटींमुळे ७६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.
वाशिममधील निराधार लाभार्थींच्या १७० प्रकरणांना मंजुरी
ठळक मुद्देश्रावणबाळ योजनेची १५३ व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ९३ प्रकरणे दाखल केली होती.श्रावण बाळ योजनेतून ११३ लाभार्थींच्या प्रकरणांना समिती सदस्यांनी मंजुरी दिली, तर ४० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.संजय गांधी योजनेंतर्गत ५७ अर्जांना मंजुरात देण्यात आली, तर ३६ अर्ज नामंजूर करण्यात आले.