शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'बहुजन हिताय' कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:43 IST

पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  कारंजा येथील बहुजन हिताय कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून कांरजा येथील सहाय्यक दुय्यक निबंधक यांची नेमण्ूाक झाल्याने सदर पतसंस्थेतील ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.  कांरजा येथील बायपास परिसरातील गुरूकृपा हॉटेलच्या ईमारतीत बहुजन हिताय कर्मचारी मर्यादित पतसंस्था रजि नं. ७६४ ही मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. सदर पतसंस्थेचे रामेश्वर सावके  यांच्या अध्यक्षतेखाली ११ संचालकांचे संचालक मंडळ होते. त्यातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधकाच्या वतीने देण्यात आली आहे. राजीनामा देणाºया संचालकात अनंता जनार्धन धोटे ,प्रविण सखाराम पुरी , विष्णू भगवान वाघ, सुधाकर श्रीकृष्ण राउुत, शेषराव मुळे व मोहन आत्माराम घाटे या संचालकांचा समावेश आहे. वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सादर केलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. सदर पतसंस्थेत ७ ते ८  ठेवीदारांच्या ३२ लाख रूपयांच्या ठेवी असून प्रशासकाची नेमणूक केल्याने ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. संचालक मंडळाच्यावतीने मजीर्तील ३५ कर्जदारांना ६५ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सध्यपरिस्थितीत सदर पतसंस्था डबघाईस आली असून पतसंस्थेत  रक्कम जमा नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे आव्हान प्रशासकापुढे उभे ठाकले आहे. आमच्या प्रतिनीधींनी कांरजाचे सहायक दुय्यम निबंधकाशी संपर्क साधला असता सदर पतसंस्थेच्या ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासक म्हणून १४ फेबु्रवारी २०१९ रोजी गुल्हाणे यांची नेमणूक करण्यात आली. कर्जदारांच्या कर्जवसुलीतून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाईल असे यावेळी बोलतांना ए. आर. गुल्हाणे यांनी सांगितले. येत्या २ ते ३ दिवसात  कर्जदाराकडून २० लाख रूपयांची वसुली करून टप्प्याटप्याने ठेवीदारांना देण्यात येईल. यासाठी १४ एप्रिल रोजी सदर पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत कर्जदारांची बैठकही घेण्यात आली. त्यामुळे सदर पतसंस्थेतील ठेवीदारांनी चिंता करू नये असे आवाहन सहायक दुय्यम निबंधक गुल्हाणे यांनी केले पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक जरी असली तरी ठेवीदारांनी काळजी करु नये. पतसंस्थेत ३२ लाखाच्या ठेवी असून त्यावर ६५ लाख कर्जवाटप आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जातील, ठेवीबद्दल काळजी करु नयेत्र-पी.एम. गुल्हाने , सहाय्यक दुय्यम निबंधक

टॅग्स :washimवाशिम