बँकेतील गर्दी टाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:41 AM2021-09-13T04:41:17+5:302021-09-13T04:41:17+5:30

.................. कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हा वाशिम : जिल्हाभरात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी नागरिकांची लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात ...

Appeal to avoid bank congestion | बँकेतील गर्दी टाळण्याचे आवाहन

बँकेतील गर्दी टाळण्याचे आवाहन

googlenewsNext

..................

कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हा

वाशिम : जिल्हाभरात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी नागरिकांची लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका गृहित धरता प्रत्येकाने लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी केले.

......................

डिझेलचे दर कमी करण्याची मागणी

वाशिम : डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे शेतशिवारांमधून वाहनांव्दारे पिकलेला शेतमाल शहरात आणण्याकरिता अधिकचा खर्च लागत आहे. ही बाब लक्षात घेता डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी शेतकरी प्रशांत इढोळे यांनी शुक्रवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली.

.............

पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याची पूर्तता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरवून शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करण्याची मागणी अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

..................

अतिक्रमण प्रस्ताव नियमानुकूल करा

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या अनेकांना अद्यापपर्यंत स्वत:च्या हक्काचे घर नाही. ही बाब लक्षात घेता निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली.

..................

‘पेव्हर ब्लाॅक’चे काम युद्धस्तरावर

वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी परिसरात विविध रस्त्यांच्या कडेला पेव्हर ब्लाॅक बसविण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यासह सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचेही काम हाती घेण्यात आले आहे. याकामी नगरसेवक विनोद खंडेलवाल यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

......................

‘एअर बंच’मुळे वीज चोरीस आळा

वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) वीजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारचे केबल टाकण्यात आल्याने महावितरणची हानी टळली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.

................

भंगार वाहनांचा लिलाव प्रलंबित

वाशिम : स्थानिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीची अनेक वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून जागीच पडून आहेत. ती सध्या भंगार झाली आहेत. या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया प्रलंबित असून ती राबविण्यात यावी, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.

.............

पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

वाशिम : सुपखेलानजीकच्या नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला. या घटनेला महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला असला तरी पुलाची दुरुस्ती अद्यापपर्यंत झालेली नाही. यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

........................

राष्ट्रीय महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण

वाशिम : गत तीन वर्षांपासून मालेगाव-शिरपूर-रिसोड-सेनगाव-हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Appeal to avoid bank congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.