शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनविरोधी रॅलीने दिला जाणार मावळत्या वर्षाला निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:19 IST

वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतले. त्याचा समारोप ३१ डिसेंबरला होत असून यादिवशी व्यसनविरोधी रॅली काढून मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतले. त्याचा समारोप ३१ डिसेंबरला होत असून यादिवशी व्यसनविरोधी रॅली काढून मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाणार असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करून धुडगुस घालतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जातात. यामुळे अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात व्यसनविरोधी मेळावे घेवून ‘अनिंस’ने जनजागृती केली. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला वाशिम शहरात दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला महिलांच्या हस्ते चपलांचा हार घालून रॅली काढली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एस. खंदारे, प्रा. यू.एस. जमधाडे, प्रा. ए.पी. राऊत, प्रा. ए.टी. वाघ, पी.एन. संधानी, डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. विक्रम चौधरी, राजू दारोकार, प्रा. सुभाष अंभोरे, प्रा. हरीदास बनसोड, विनोद तायडे, गजानन धामणे, दिनकर बोडखे, प्रा. ऊन्मेश घुगे, अ‍ॅड. दिपाली सांबर आदिंनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम