शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात आणखी एक महिला कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:08 IST

मुंबई येथून ३ जून रोजी मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन रुग्णांचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मुंबई येथून ३ जून रोजी मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ वर पोहोचली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत सहा जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या १९ अहवालांपैकी २ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत. यापैकी एक युवती बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील असून, ती कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. तिच्यावर वाशिम येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत, तर मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षीय बालकाचा अहवालही 'पॉझिटिव्ह' आला. त्याच्या वडिलांचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला होता, तर आईचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोहरादेवी, वसंतनगर सील करून या भागातील ५८०० नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली असतानाच मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातल रामगाव येथे ३ जून रोजी परत आलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवालही मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभाग सर्तक झाले आहे. सदर महिलेवर मंगरुळपीर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात असून, ८०० लोकसंख्येचे रामगाव कन्टेनमेंट झोन जाहिर करून बुधवारी सील केले जाणार आहे. त्या बालकाच्या संपर्कातील १२ जण आयसोलेशन कक्षातमुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे परतलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षीय बालकाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने त्याच्या हायरिस्क संपर्कातील माहिती घेत १२ जणांना मानोरा येथील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात रवाना केले आहे. त्याशिवाय पोहरादेवी, वसंतनगर येथे आरोग्य पथक दाखल झाले असून, या गावातील ५८०० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली आहे.आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सुरुवात मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे मुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे कुटूंबासोबत आलेल्या एका ८ वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असतानाच मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे ३ जून रोजी मुंबई येथून परतलेल्या ६० वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवालही पॉझिटीव्ह आल्याने या दोन्ही गावांत आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात पोहरादेवी वसंतनगरमधील ५ हजार ८०० पेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची, तर रामगाव येथील ८०० नागरिकांच्या आरोग्याच्या माहितीचे संकलन करून त्यांची पुढील १४ दिवस तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याMangrulpirमंगरूळपीर