शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ६८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, गुरूवार १८ जून रोजी प्राप्त १५ अहवालांपैकी एक जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, गुरूवार १८ जून रोजी प्राप्त १५ अहवालांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरीत १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८ झाली असून, दोघांचा मृत्यू तर १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ५४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांत केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली. १६ व १७ जून रोजी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १८ जून रोजी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आसेगाव पेन (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर महिलेला ‘सारी’ची लक्षणे असल्याने जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. ८३८ पैकी ७४६ नमुने निगेटिव्ह; ६६ पॉझिटिव्हआतापर्यंत ८३८ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६६ पॉझिटिव्ह तर ७४६ अहवाल निगेटिव्ह आले. २७ अहवालांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे बाहेरच्या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवालाची नोंद असलेले; परंतू वाशिम येथे उपचार घेतलेले दोन रुग्ण असल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६८ अशी आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर १२ जणांना डिस्चार्ज दिल्याने आता ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दोन जणांची कोरोनावर मातजिल्ह्यातील दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना १८ जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचार घेत असलेल्या ५४ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.४कारंजा येथील कोरोनाबाधित ५७ वर्षीय महिलेवर अकोला येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १७ जून रोजी या महिलेचा अकोल्यात मृत्यू झाला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या