गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शिवाजी नगर येथील १, ईश्वरी कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील १, जैन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, तामसी येथील १, अनसिंग येथील १, अडोळी येथील १, काटा येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, मोहरी येथील १, रिसोड तालुक्यातील कवठा येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर येथील १, किन्ही घोडमोड येथील १, झोडगा बु. येथील १, डोंगरकिन्ही येथील १, वसारी येथील १; तर कारंजा शहरातील ५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ८६० वर पोहोचला असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून १३४ झाली आहे. आतापर्यंत ६ हजार ५७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर १५२ लोकांचा आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आणखी २८ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST