शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ८०७ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:33 IST

आणखी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून आणखी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८१३ झाली आहे.जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग आॅगस्ट महिन्यात अधिकच वाढला असून, यामध्ये ६ आॅगस्ट रोजी आणखी २३ रुग्णांची भर पडली. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन दिवसातच कोरोनाबाधिताच्या आकड्याने ७०० चा टप्पा ओलांडला. त्यानंतरच तीन दिवसात शंभरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता हा आकडा ८१३ वर पोहचला. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ८, टिळक चौक परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसर ३, तहसीलदार कार्यालय परिसर ४, कवठळ येथील १ असे एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील ५ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. आता एकूण रुग्णसंख्या ८१३ झाली असून, १७ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ४७० लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३२५ जणांवर जिल्हा उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

पाच जणांची कोरोनावर मातबुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, नांदगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील १ आणि कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४७० जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या