शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या मदतीला धावला ‘अनिल’ ; ९० लाभार्थ्यांना मोफत तयार करुन दिले घरकुलांचे नकाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 14:08 IST

वाशिम येथीलही एका समाजसेवी ‘अनिल’ने गोरगरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाचा हातभार लावला.

- नंदकिशोर नारे

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली महत्वकांक्षी योजना. प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने आखणी करण्यात आलेल्या या योजनेत वाशिम येथीलही एका समाजसेवी ‘अनिल’ने गोरगरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबे, दिव्यांगांना मदतीचा हात मिळाला. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे गोळा करतांना लाभार्थ्याना नाकीनऊ येत असले तरी ते सहज उपलब्धही होतात.परंतु यामधील सर्वात महत्वाचा कागद म्हणजे घरबांधकामाचा नकाशा. हा नकाशा काढायचा झाल्यास लाभार्थ्यांना आर्कीटेक्ट, बिल्डर्स, इंजिनिअर्स यांचा आधार घ्यावा लागतो. यासाठी ६ ते ७ हजार रुपये सुध्दा मोजावे लागतात. लाभार्थी पैशाची जुळवा जुळव करुन यासाठी प्रयत्नही करतात परंतु वाशिम येथील समाजसेवी अनिल केंदळे यांनी चक्क गरिब, दिव्यांगाना हे नकाशे मोफत तयार करुन एक सामाजिक कार्य पार पाडले. वाशिम नगरपरिषेद अंतर्गंत पंतप्रधान आवास योजनेसाठी जवळपास ४७०० अर्ज प्राप्त झालेत. यापैकी ३८२ घरकुलांचे प्रस्ताव मंजुर झालेत यापैकी जवळपास ९० लाभार्थ्यांच्या घरांचे नकाशे अनिल केंदळे यांनी लाभार्थ्यांना मोफत तयार करुन दिलेत. मंजुर लाभार्थ्यांपैकी १० ते १५ नागरिकांना अनुदानाचे धनादेश सुध्दा देण्यात आले आहेत. अनिल केंदळे यांनी ज्या गोरगरिबांना, दिव्यांगांना सहकार्य केले ते आज मोठया अभिमानाने आमचे घर ‘अनिलभाऊं’मुळे झाल्याचे सांगत आहेत.  असे असले तरी केंदळे यांनी याबाबत कोणालाही काही न सांगता आपले कर्तव्य पार पाडले आहे. याबाबत कोणी विचारणाही केली तर आपल्या कार्याची कोण्या गोरगरिबांना मदत होत असेल तर याऐवढे पुण्य तरी कोणते असे ते मानतात. त्यांच्या या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमsocial workerसमाजसेवक