शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते आधार कार्डशी संलग्न न झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून्या पद्धतीनेच मिळणार मानधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:43 IST

वाशिम - बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने वितरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आदींकडून बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक जोडणीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.सर्व अंगणवाडी कर्मचाºयांची बँक खाती आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ अशी निश्चित केली आहे.वाशिम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाºयांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

वाशिम - गत वर्षापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना आधार संलग्नित बँक खात्यात मानधन अदा केले जात आहे. मात्र, अद्याप काही कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न झाली नसल्याने मानधन वितरणाचा पेच निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने वितरण केले जाणार आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी वेतनाला आॅनलाईनची जोड देण्यासाठी फेब्रुवारी २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आदींकडून बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक जोडणीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. अद्याप काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नाहीत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास २३० कर्मचाºयांचा समावेश आहे. बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झाल्याने पश्चिम वºहाडातील काही अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन आॅनलाईन पद्धतीने होऊ शकले नाही. या कर्मचाºयांकडून आधार क्रमांक वारंवार मागविण्यात आले. मात्र, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न झाल्याने मानधनाचा पेच निर्माण झाला. सन २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला शेवटचा एक महिना शिल्लक असल्याने आधार क्रमांकाअभावी मानधन रखडलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने दिले जाणार आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाºयांची बँक खाती आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ अशी निश्चित केली आहे. कोणत्याही परिस्थितीत १ एप्रिल २०१८ पासून अंगणवाडी कर्मचाºयांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने आधार संलग्नित बँक खात्यातच जमा करण्यात यावे, अशा सूचना वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाºयांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. वाशिम तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाºयांना आधार क्रमांक हा बँक खात्याशी संलग्नित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड