शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोविड-१९’च्या सर्वेक्षणातून अंगणवाडी सेविकांना वगळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:33 IST

अमरावती विभागातील अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाच्या या जबाबदारीतून मुक्त करण्याची प्रशासकीय कार्यवाही हाती घेण्यात आली.

वाशिम : अंगणवाडी सेविका या अत्यंत संवेदनशील घटकांसाठी (० ते ६ वर्षे वयोगटातील बालके व गरोदर, स्तनदा माता) काम करीत असल्याने यापुढे त्यांच्याकडे कोविड-१९ च्या संदर्भात सर्वेक्षणाचे काम देण्यात येऊ नये, अशा सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १९ जुलै रोजी दिल्या. त्यानुसार अमरावती विभागातील अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाच्या या जबाबदारीतून मुक्त करण्याची प्रशासकीय कार्यवाही हाती घेण्यात आली.मार्च २०२० पासून राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वेक्षण व त्या अनुषंगाने असलेली कामे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागातील अंगणवाडी सेविकांवर सोपविलेली आहेत. आतापर्यंत अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणाची कामे केलेली आहेत. सर्वेक्षणाच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामकाजावर परिणाम होत आहे. अंगणवाडी सेविका या अत्यंत संवेदनशील घटकांसाठी (० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता) काम करीत असल्याने, यापुढे सर्वेक्षणासंदर्भातील विविध कामे दिली तर अंगणवाडी सेविका कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता व गरोदर स्त्रिया या अत्यंत संवेदनशील घटकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. या पृष्ठभूमीवर यापुढे अंगणवाडी सेविकांना कोरोनासंदर्भात सर्वेक्षणाचे काम देण्यात येऊ नये, अशा सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १९ जुलै रोजी दिल्या. या सुचनांच्या अनुषंगाने अमरावती विभागात अंगणवाडी सेविकांकडून सर्वेक्षणाची कामे काढून घेण्याची कार्यवाही केली जात आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १०७६ अंगणवाडी सेविका असून, कोणत्या सेविकांकडे सर्वेक्षणाची कामे आहेत याची माहिती तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकाºयांकडून घेतली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या