शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांसाठी आता अंगणवाडी स्तरावर उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:35 IST

वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देकुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. बालकांचे वर्गीकरण करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र गटातील बालकांची संख्या निश्चित झाल्यानंतर ग्राम बालविकास केंद्रांची संख्या ठरविली जाणार आहे.

वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे.कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार दिला जातो. तीव्र कुपोषित गटातील बालकांना अंगणवाडी स्तरावरच ग्राम बालविकास केंद्रातून तीन महिने सतत उपचार मिळण्याची सुविधा आता उपलब्ध केली जाणार आहे. वाशिम जिल्हयात १०७६ च्या आसपास अंगणवाडी केंद्र आहेत. अतितीव्र व तीव्र गटातील बालकांना विशेष पोषक आहार व उपचार मिळावे, यासाठी ग्राम बाल विकास केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. बालकांचे वर्गीकरण करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. तत्पूर्वी बालविकास प्रकल्प अधिकारी स्तरावरून अंगणवाडी केंद्र स्तरावर चाचपणी केली जात आहे. बालकांचे वजन, उंची, लांबी व दंडघेर घेऊन बालकांचे वर्गीकरण करणे आणि तिव्र कुपोषित आढळून आल्यास त्या बालकाला ग्राम बालविकास केंद्रात अतिरिक्त पोषक आहार, पोषक तत्वांचा अतिरिक्त डोज व औषधी देणे, अशी ही व्यवस्था राहणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या उपस्थितीत अतितीव्र, तीव्र गटातील कुपोषित बालकांची देखरेख केली जाणार आहे. तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र गटातील बालकांची संख्या निश्चित झाल्यानंतर ग्राम बालविकास केंद्रांची संख्या ठरविली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम