शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा, मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांची १२.७६ कोटींची थकबाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 15:43 IST

वाशिम : कारंजा आणि मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांकडे १२.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे

ठळक मुद्देदोन्ही मोठ्या पाणीपुरवठा योजनांतर्गत नागरिकांकडे १२.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.कारंजाची ११ कोटी ७५ लाख ८ हजार; तर मानोरा २९ गावे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १ कोटी ८१ हजार आहे. याशिवाय चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपये असून त्यातील ५५ टक्के वसूली पूर्ण झाल्याची माहिती जीवने यांनी दिली.

वाशिम : कारंजा आणि मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांकडे १२.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची डोकेदुखी वाढली असून थकबाकी वसूलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘मजिप्रा’चे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी मंगळवारी दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून संपूर्ण कारंजा शहरात पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय मानोरा २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही हाताळली जाते. दरम्यान, या दोन्ही मोठ्या पाणीपुरवठा योजनांतर्गत नागरिकांकडे १२.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात कारंजाची ११ कोटी ७५ लाख ८ हजार; तर मानोरा २९ गावे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १ कोटी ८१ हजार आहे. याशिवाय चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपये असून त्यातील ५५ टक्के वसूली पूर्ण झाल्याची माहिती जीवने यांनी दिली. तथापि, मागील थकबाकीसह चालू थकबाकी विनाविलंब वसूल करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सतत पाठपुरावा सुरू असल्याने स्थानिक पातळीवरून वसूलीच्या मोहिमेस गती देण्यात आल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत चालविल्या जाणाºया पाणीपुरवठा योजनांची नियमित वसूली होणे आवश्यक आहे. त्यातूनच पाणी शुद्धीकरणासाठी अ‍ॅलम, ब्लिचिंग खरेदी करणे, विद्यूत देयक अदा करणे याशिवाय देखभाल-दुरूस्तीवरील खर्च भागविला जातो. ही बाब लक्षात घेवून नागरिकांनी त्यांच्याकडील थकबाकी विनाविलंब अदा करून ‘मजिप्रा’ला सहकार्य करणे अपेक्षित आहे.- के.के.जीवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाManoraमानोरा