शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्यापोटी शासनाकडून प्राप्त ४.४७ कोटींची रक्कम पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 14:45 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिक विम्यापोटी ४.४७ कोटी रुपये नुकसान भरपाईची दिलेली रक्कमही वाटपाअभावी पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १८ टक्केच पिक कर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बँका याबाबत उदासीन असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिक विम्यापोटी ४.४७ कोटी रुपये नुकसान भरपाईची दिलेली रक्कमही वाटपाअभावी पडून आहे. दरम्यान, ही बाब अत्यंत गंभीर असून यासंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी २७ जून रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत संबंधित जबाबदार यंत्रणांना या मुद्यांवरून चांगलेच धारेवर धरले.जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह निमंत्रित, अशासकीय सदस्य व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक पात्र शेतकºयास बँकेने पिक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; मात्र सद्य:स्थितीत केवळ १८ टक्केच पिक कर्जाचे वितरण झाले आहे. ही आकडेवारी अत्यंत असमाधानकारक आहे. संबंधित बँकांनी पिक कर्ज वितरणाचा वेग वाढविण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामात काढलेल्या प्रधानमंत्री पिक विमाअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील १८ हजार २९४ शेतकºयांना ४.४८ कोटी रुपये मंजूर होवून ती रक्कम संबंधित बँकांना वितरीत करण्यात आली आहे. संबंधित विमा कंपनीने पुढील कार्यवाही त्वरित करून व बँकेशी समन्वय साधून भरपाईची रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास संबंधितांविरूद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.विमा कंपनीने प्रतिनिधी द्यावाप्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यापुढे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अनुषंगाने लोकांना माहिती देणे व त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित विमा कंपनीचा एक प्रतिनिधी उपस्थित ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यासाठी नेमून दिलेल्या कंपनीने त्वरित आपले प्रतिनिधी सहाही तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयात उपस्थित ठेवावेत. याबाबत दिरंगाई झाल्यास आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री राठोड यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा