शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

वाशिम जिल्ह्यात रूग्णवाहिकेची सेवा कोलमडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:36 IST

बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय रुग्णवाहिकेची सेवा कोलमडली आहे. गंभीर जखमींवर उपचारासाठी सुरू केलेल्या १०८ या रूग्णवाहिकेसह ईतर शासकीय रूग्णवाहिकाही तांत्रिक बिघाड आणि रिक्त पदांमुळे उपलब्ध होणे कठीण झाले आहे.आपत्कालीन सेवा देणाº्या बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त यांच्याकडून रुग्णसेवाच्या मेंटनन्ससंदर्भात विशेष सूचनादेखील देण्यात येतात; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष होत असून, आरोग्य विभागाकडून नियमित आढावा घेण्यात येत नाही. रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी जीवनदायिनी आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर पोहोचून रुग्णवाहिका दररोज शेकडो प्राण वाचविते; पण खराब रस्ते अन् सरकारी यंत्रणेच्या तिच्या मेंटनन्सकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे या रुग्णवाहिकांनाच उपचाराची गरज आहे. शासकीय यंत्रणेंतर्गत गर्भवतींसाठी ग्रामीण भागात १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका मोलाची भूमिका बजावते; परंतु खिळखिळ्या अवस्थेतील या रुग्णवाहिकेत गर्भवतींचा प्रवास वेदनादायकच होत आहे. शिवाय, आवश्यक सुविधांचाही अभाव आहे. यासोबतच दररोज शेकडो प्राण वाचविणारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाही मेंटनन्सअभावी उपचाराची गरज भासू लागली आहे. नादुरुस्त असल्या तरी रस्त्यावर धावताहेत, प्रशासन रुग्णवाहिकांच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रकार रुग्णांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिकांची संख्या ११ असून यातील रिसोड गमीण रूग्णालयातील रूग्णवाहिका नादुरूस्त आहे. त्याशिवाय या रूग्णवाहिकांवर स्वत्तंत्र डॉक्टर आवश्यक असताना १२ तासांच्या दोन पाळ्यांसाठीही डॉक्टरांची संख्या अपूरी असून, सद्यस्थितीत या रूग्णवाहिकांसाठी केवळ १६ डॉक्टर उपलब्ध आहेत. अर्थात १०८ रूग्णवाहिकांसाठी डॉक्टरांचा किमान ६ पदे रिक्त आहेत. १०२ या रूग्णवाहिका ३४ आहेत. त्यापैकी मेडशी, शिरपूर, धामणी,मानोरा आणि मंगरूळपीर येथील मिळून ५ रूग्णवाहिका गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून नादुरूस्त आहेत. त्यामुळे गोरगरीब गंभीर आजारी रूग्णा, गर्भवती महिलांना वेळेवर आरेग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे.१५ दिवसांपासून रूग्णवाहिका बंदजिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, १०२ क्रमांका्च्या एकूण ३४ रूग्णवाहिका आहेत. त्यापैकी मेडशी, शिरपूर, धामणी, मानोरा व मंगरूळपीर येथील पाच रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरूस्त आहेत. त्यामुळे १५० पेक्षा अधिक रूग्णांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागला.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका ११ आहेत. यापैकी रिसोड येथील रुग्णवाहिका बंद तर अन्य तीन रुग्णवाहिका तांत्रिक कारणामुळे अधूनमधून बंद असतात. रिसोड तालुक्यात जवळपास ८२ गावे येतात. ४१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी सहा डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने जवळपास तीन रुग्णवाहिकाही सुरळीत सेवा देण्यात अपूऱ्या पडत आहेत. ४जिल्ह्यातील रुग्णवाहिकेच्या दुरूस्तीकडे तसेच सेवेकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य