शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:52 IST

वाशिम: जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य कें द्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत कंत्राटी चालकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य कें द्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत कंत्राटी चालकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. आधीच वेतन तुटपुंजे असताना ते वेळेवर मिळत नसल्याने या चालकांच्या कुटूंबाची उपासमार होत आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ आरोग्य उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांत विविध संवर्गातील हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांचे नियंत्रण आणि सोयीसुविधांची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. प्राथमिक स्वरुपात पंचायत समित्यामधील आरोग्य विभागाचे या आरोग्य केंद्रांवर नियंत्रण आहे. तथापि, जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, तर कधी औषधींचा तुटवडा आदि समस्या आरोग्य केंद्रांत पाहायला मिळतात. या आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाºयांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. आता हा त्रास सहन करतानाच वेतनास होणाºया विलंबाचीही त्यात भर पडत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत १२ कंत्राटी कर्मचाºयांना थकीत वेतनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थकले आहे. रात्री, अपरात्री गंभीर रुग्णाला तातडीने जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतानाही वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेऊन वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी हे चालक करीत आहेत. 

 प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या चालकांची पदे रुग्ण कल्याण समितीमार्फत भरण्यात येतात. तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांचे वेतन अदा करण्यात येते. सर्व चालक कर्मचाºयांचे वेतन नियमित अदा करण्यात येत असून, कोणाचे वेतन थकले असल्याची माहिती आपल्याला मिळाली नाही. ज्या चालकाचे वेतन थकले असेल, त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.               -डॉ. अविनाश अहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी , वाशिम

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी