शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:32 IST

Mucormycosis News : किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असताना, इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. अकोला, नागपूर येथून औषधी, इंजेक्शन आणावे लागत असून, निर्धारित किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते.कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. ११ मे रोजी एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. मुख, दात, डोळे आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर डाॅक्टरांकडे रुग्ण उपचारासाठी जात आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सर्वत्रच म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याने इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना अकोला, नागपूर येथून इंजेक्शन, औषधी आणण्याची वेळ आली आहे. 

३० व्हायल हव्या, मिळतात दोन ते सहा

कोरोनापूर्वी जिल्ह्यात एक, दोन इंजेक्शनची गरज पडत होती. आता लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनच्या दररोज २० ते ३० व्हायल उपलब्ध असावे, असे डॉक्टरांना अपेक्षित आहे. मात्र, दोन ते सहा व्हायल मिळत असल्याने अनेक रुग्ण हे उपचारासाठी परजिल्ह्यात जात आहेत.

एका रुग्णाला लागतात ४५ डोसnएका रुग्णाला दररोज तीन डोस याप्रमाणे दोन आठवड्यांपर्यंत इंजेक्शन, गोळ्या घ्याव्या लागतात. यासाठी किमान दीड लाख ते दोन लाखांपर्यंत खर्च येऊ शकताे. ल्ह्यात तुटवडा असल्याने काही जण अकोला व नागपूर येथून इंजेक्शन व औषधी मागवितात. काही ठिकाणी एमआरपीपेक्षा थोडी अधिक किंमत आकारतात.

घाबरून जाऊ नका, उपचार घ्या !पोस्ट कोविडनंतर तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, अचानक दात हलणे, अशी लक्षणे आढळून आली तर रुग्णांनी घाबरून न जाता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.- डॉ. मंजूषा वराडे, दंतरोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसwashimवाशिम